नकलाकार ते नाट्यप्रशिक्षक!, प्रकाश पारखींचा प्रेरणादायी प्रवास | गोष्ट असामान्यांची-भाग ४९| Loksatta

2023-08-02 3

प्रसिद्ध बालनाट्य प्रशिक्षक, ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रकाश पारखी हे गेल्या ५१ वर्षांपासून नाट्य क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत. १९७८ साली पुण्यात नाट्यसंस्कार कला अकादमीचा पाया त्यांनी रचला. १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी नाट्यप्रशिक्षण दिलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, गायत्री दातार व असे अनेक नामवंत कलाकारही पारखी यांच्याच मार्गदर्शनाखाली घडले. महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम समितीचे ते माजी सदस्यही होते. तसंच बालरंगभूमीचं पुण्यातील पहिलं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. नकलाकार, बालनाट्य दिग्दर्शक, प्रशिक्षक, व्याख्याते अशा अनेक भूमिका बजावणाऱ्या प्रकाश पारखी यांचा हा प्रेरणादायी प्रवास व्हिडीओमध्ये पाहा...

Videos similaires